लाईफ लाईन हॉस्पिटल येथे आरोग्याचे वाण देऊन हळदी कुंकू कार्यक्रम साजरा
सिटी बेल ∆ पनवेल ∆
आबासाहेब बेडसे चारिटेबल ट्रस्ट, लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आगळावेगळा हळदी कुंकाचा कार्यक्रम आरोग्याचे वाण देऊन साजरा करण्यात आला.
या समारंभाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सुविद्या पत्नी सौ. वर्षा ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री. गणेश देशमुख साहेब यांच्या सुविद्या पत्नी सौ. नेहा देशमुख, आदरणीय परेश ठाकूर यांच्या सुविद्या पत्नी सौ. अर्चना ठाकूर, माजी नगरसेविका सौ. सुलोचना कल्याणकर, माजी नगरसेविका सौ. माधुरी गोसावी, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर जयश्री पाटील, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर केतकी पाटील म्हस्के, हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जानवी पाटील, सौ. कल्पना नागावकर, सौ. वृषाली सावळेकर, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या प्रेसिडेंट सौ. सई कांडपिळे, परभणी महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर विद्याताई पाटील या सर्वांनी दीप प्रज्वलन करून हळदी कुंकूच्या निमित्ताने आरोग्याचे वाण या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
हळदी कुंकूच्या कार्यक्रमांमध्ये जे आरोग्याचे वाण देण्यात आले त्यामध्ये 250 महिलांच्या आरोग्य तपासणी केल्या गेल्या त्यामध्ये बीएमडी म्हणजेच शरीरातील कॅल्शियमचे तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तातील लोहच प्रमाण, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, वेट, बी एम आय, अशा अनेक टेस्ट करण्यात आला करण्यात, असा हा आगळावेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आरोग्याचे वाण देऊन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये पनवेलमधील अनेक प्रतिष्ठित महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता तसेच पनवेलच्या लाईफ लाईन हॉस्पिटलच्या च्या सर्व महिलांनी त्याचा आनंद लुटला, या हळदीकुंकू मध्ये महिलांनी नटून थटून सजून आलेल्या महिलांनी सेल्फी पॉईंट वरती आपले फोटो काढून आनंद द्विगुणीत केला असा हा हळदी कुंकाचा आगळा वेगळा आरोग्याचं वाण देऊन कार्यक्रम लाईफ लाईन हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला.
Be First to Comment