मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने सेवा ही संघटन मानून सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत विठ्ठल नगर मधील भाजपा कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शंकरा आय हॉस्पिटल आणि श्रीपाद आयुर्वेदिक क्लिनिक यांनी तपासणी केली, 117 लोकांनी याचा लाभ घेतला यात 14 लोकांना मोतिबिंदु आढ़ळला. त्यातील 9 लोकांना आज शंकरा आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिये साठी नेले. तसेच आरोग्य तपासणी मधे काही लोकांना मधुमेह गूढ़गे दुखी आढ़ळली. त्यांना औषधे देऊन उपचार करण्यात आले.
याप्रसंगी सुनिल गोगटे, सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता, महिला मोर्चा शहराध्यक्ष शर्वरी कांबळे, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भगत, तालुका अध्यक्ष महिला मोर्चा स्नेहा गोगटे, सोनाली जाधव, राधा बहुतुले, गीता कदम, पुनम डेरवणकर, तालुका आय टी सेल बिराज पाटकर, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश गवई, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे, रवींद्र जाधव, दर्पण घारे, अजिंक्य भुंडेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Be First to Comment