“मुसाफिर तू” या गाण्याच्या माध्यमातून पनवेलच्या तरुणांनी दिला तणावमुक्त राहण्याचा अनोखा संदेश
सिटी बेल ∆ श्वेता भोईर ∆
सध्याची तरुणाई अनेकविध कारणांमुळे डिप्रेशन मध्ये जात आहे. तणावमुक्त राहायचे असेल, मनशांती हवी असेल तर घराच्या बाहेर पडा, स्वतःसाठी वेळ द्या, खूप प्रवास करा व आयुष्याचा आनंद घ्या असा संदेश “मुसाफिर तू” या इंडी पॉप ट्रॅव्हल म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून पनवेलच्या तरुणांनी दिला आहे.
“मुसाफिर तू” हे गाणे पनवेलच्या रोहित दर्जी यांनी लिहिले असून ते संगीतबद्ध करून त्यांनीच गायले आहे आहे. तर ट्रॅव्हलर प्रसन्न घाग यांनी व्हिडीओ शूट केले आहे. या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी त्यांनी तब्बल ७०० किलोमीटर हुन अधिक प्रवास केला आहे. त्यांनी नाशिक मधील भंडारदरा, शेंडी, रतनगड, सिन्नर, घोटी, त्रिंबक व अश्या अनेक ठिकाणांचा यात समावेश आहे. त्यांनी हा संपूर्ण रोमांचक प्रवास रोडट्रीपच्या माध्यमातून बाइक रायडींग करून पूर्ण केला आहे. हे गाणे युट्युबसह इतर सर्व डिजिटल म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर उपल्बध आहे.
सध्याच्या युवा पिढीची परिस्थिती पाहता त्यांनी या आगळ्यावेगळ्या विषयावर लक्ष केंद्रित करून तणावमुक्त राहण्यासाठी प्रवास करा, आठवणी बनवा व आयुष्याचा आनंद घ्या हा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.
Be First to Comment