प्रदिप गोगटे ठरले इंडिया एक्सलेन्स पुरस्कार 2023 – 24 चे मानकरी
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
18 वर्षांचे नाट्यक्षेत्रातील कार्य आणि बालनाट्य चळवळ तसेच एक हजार कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे कर्जतचे अभिनेते, दिग्दर्शक प्रदिप गोगटे ठरले ‘आर्टस बिट्स फाऊंडेशन’ पुणे यांच्या ‘इंडिया एक्सलेन्स पुरस्कार 2023 – 24 चे मानकरी ठरले आहेत.
प्रदीप गोगटे कर्जतच्या बालकलाकारांना घेऊन केलेल्या शॉर्टफिल्म ‘वळण’ आत्तापर्यंत 97 पुरस्कार मिळाले असून लवकरच शंभर पुरस्कार मिळवणारी ‘वळण’ ही रायगड जिल्ह्यातील एकमेव शॉर्टफिल्म म्हणून इतिहास रचणार आहे. लवकरच स्वत:चे व्यावसायिक नाटक ही ते घेऊन येत आहेत, ज्यात ते स्वतः आपल्या अभिनयाची चुणूक ही दाखवणार आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. अजून चांगले काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मिळाली आहे. असे गोगटे यांनी सांगितले.
Be First to Comment