ठरलं ! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाला अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी
सिटी बेल ∆ मुंबई ∆
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे ही येथील प्रकल्पग्रस्तांची गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी होती मात्र राज्याच्या सत्तेवर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विराजमान होताच शिवसेनेकडून या विमानतळाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली यानंतर मात्र येथील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त व शिवसेना यामध्ये या नामांतराचा वाद चिघळत चालला होता मात्र आता हा वाद संपुष्टात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यास आमची हरकत नाही असे जाहीर केले आहे.
पनवेल उरण महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या भावना समजावून सांगत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करत विमानतळाला लोकनेते दिवा पाटलांचे नाव असेल असे जाहीर केले.
याप्रसंगी पनवेल उरण महा विकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा पनवेल उरण महा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत, पनवेल उरण महा विकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, अभिजीत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत आदींसह महाविकास आघाडीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
Be First to Comment