सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆
तालुक्यात काळव्याला पाणी जरी येत नसले तरी सुद्धा नदि काठी असलेल्या भात शेती करण्यात शेतकरी वर्ग भर देत आहे.बदलत्या वातावरण पिकांच्यावर खोड किडा पडू नये यासाठी शेतकरी शेतामध्ये भात लागवड केलेल्या भाताला औषधे तसेच खते देण्यास सुरुवात झाली आहे.उन्हाळी पिके ही शेतकरी वर्गांसाठी तारक ठरत असून या पासून मोठ्याप्रमाणावर उत्पन्न मिळत असल्यामुळे उन्हाळी भात शेती लागवड करीत आहे.
निंबोडे वाडी येथे काही शेतकरी वर्गांची जमीन ही नदि काठी असल्यामुळे उन्हाळी भात शेती लागवड करीत आहे.फ्रेब्रुवारी च्या महिन्याच्या अखेरीस शेतातील लागवडीची कामे पूर्ण झाली.असून शेतातील तण,गवत,हे रोपाच्या मुळाशी वाढत असल्याने भातचे पिक येण्यास अडथळा निर्माण करतात.यांना योग्य वेळीस उपटून टाकले नाही तर शेतक-यांना हवे तसे धान्य मिळत नाही.यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामात मग्न झाल्यांचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे
भात पिकण्यासाठी २.५ महिने शिल्लक राहिले त्याचबरोबर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या मध्ये वातावरणात फेरबदल होत असतात.त्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते.ते होऊ नये म्हणून शेतकरी लवकर पेरणी करून शेतक-यांनी शेतात लागवडपूर्ण केली आहे. उन्हाळी शेतीचे पिके हि शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची वाटतात.शिवाय उन्हाळी शेती मुळे काही जणांना रोजगार मिळत असते.तालुक्यामध्ये नदि काठी असलेल्या भात शेती शेतकरी वर्षातून दोनवेळा पिके घेत आहेत,असल्याचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
Be First to Comment