Press "Enter" to skip to content

गावरान आंब्यांना मोहर

थंडीमुळे आंब्याला मोहोर येण्याची सुरुवात, वातावरण बदला मुळे मोहर संकटात

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆ पाताळगंगा ∆

थंडीच्या वाढत्या प्रमाणामुळे आंब्यांना मोहोर येण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असून,अनेक ठीकाणी गावरान आंब्यांना मोठ्या प्रमाणात मोहर आलेला पहावयास मिळत आहे.यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात आंबे खावयास मिळणार आहे.मात्र वातावरणाच्या बदला मुळे दर वर्षी आंब्यांच्या मोहराला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

मोहर आल्याने फळ धारणेतील फळांची गळती होत असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. फळांची गळती थांबावी आणि मोहरचे संरक्षण व्हावे,यासाठी औषधांची फवारणीची लगबग शेतकरी वर्गात सुरू आहे. मोहोर चांगल्या प्रमाणात असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

मोहोरामध्ये फलधारणा झाली असून,काही ठिकाणी हिरव्या वाटाण्याएवढी, तर काही ठिकाणी आवळा व सुपारी एवढ्या आकाराची कैरी झाली आहे.सध्या आंबा फळे आकाराने लहान असली तरी काही दिवसात च कैरी बाजारात दाखल होण्याची शक्यता शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.हवामान बदलामुळे ह्या मोहर आलेला गळून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गांकडून वर्तवली जाता आहे.

मात्र आंब्यांची फळगळती रोखण्यासाठी शेतक-यांनी कंबर कसली आहे.कारण आताच आपण फळगळती रोखली तर भविष्यात आपल्याला आंबे खावयास मिळणार आहे.यांच विचारांतून शेतक- यांची लगबग झाली सुरु झाली आहे.आंब्याना आलेला मोहर पाहून या वर्षी चांगलेच आंबे खावयास मिळणार अशी खवयेप्रेमींनी भावना व्यक्त करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.