भात खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा बोनस
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी पनवेल तालुका सहकारी भात खरेदी केंद्रावर आपले रजिस्ट्रेशन केले होते.महाराष्ट्र शासनाच्या लिमिट नुसार 80% शेतकऱ्यांचा भात या केंद्रावर खरेदी केला होता. त्या मुळे त्यातील काही शेतकऱ्यांचा भात खरेदी करता आला नाही .अश्या सर्व शेतकऱ्यांना मोबदला म्हणून शासनाने बोनस स्वरूपात भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने तहसीलदार यांच्या कडे केली होती. त्या मागणीला यश आले असून शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि, पनवेल तालुक्यात एकूण 2070शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. त्या पैकी 80%शेतकऱ्यांचा भात या केंद्रावर खरेदी केला होता . उर्वरित शेतकऱ्यांचा भात खरेदी न झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते या बाबत पनवेल भात गिरणीचे माजी चेअरमन मनोहर भोईर यांनी दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी तहसीलदार पनवेल यांना लेखी निवेदन दिले होते, तसेच या बाबत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद आम जयंतभाई पाटील आणि मा आम बाळाराम यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता . त्याला यश आले असून आता पनवेल मधील 367शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून त्यांचा बँक खात्यावर बोनसची रक्कम जमा झाली आहे.
या मुळे भरत पवार (मोहपे )आणि सुरेश भोईर (भाताण )यांनी आम जयंतभाई पाटील, मा आम बाळाराम, पनवेल भात गिरणी चेअरमन रवींद्र पाटिल , माजी चेअरमन मनोहर पाटील यांचे आभार मानले आहेत.
Be First to Comment