सिटी बेल लाइव्ह / कथा कट्टा 🔶🔷🔶🔷
एका खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा काँलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत होता. त्याच्या वडीलांनी त्याच्या परीक्षेच्या विषयी विचारले असता तो म्हणतो “कदाचित मी काँलेजात पहिला येऊ शकतो ,जर मी पहिला आलो तर मला ती आवडलेली महागडी कार तुम्ही देणार का?
वडील खुशीत म्हणतात हो का नाही देणार?
ते त्यांना शक्य होते त्याच्या जवळ पैशाची काही कमी नव्हती ते खूप श्रीमंत होते .
हे मुलाने ऐकताच दुप्पट उत्साहाने तो अभ्यास करू लागला, रोज येता जाता शो रूममध्ये ठेवलेल्या कार ला तो पाहायचा आणि मनात कल्पना करायचा की तो आपली मनपसंद कार चालवत आहे .
काही दिवसांनी त्याच्या परिक्षेचा निकाल आला
तो पूर्ण काँलेजात पहिला आला,त्याने फोन करून वडिलांना सांगितले मी पहिला आलो माझी कार तयार ठेवा मी घरी येतोय.
घरी येताच तो मनात आपली कार अंगणात पाहू लागला पण त्याला कार काही दिसली नाही
तो खिन्न मनाने वडिलांच्या खोलीत गेला, त्याला पाहताच वडिलांनी त्याला मिठी मारली आणि कागदात गुंडाळून एक वस्तू त्याला दिली आणि सांगितले हे घे तुझं गिफ्ट .
मुलाने उदास मनाने ते गिफ्ट घेतले आणि आपल्या खोलीत गेला. मनातल्या मनात वडिलांना दोष देऊन ते गिफ्ट खोलले आत मध्ये सोनेरी कागदात त्याला रामायणाचे पुस्तक आढळले ,त्याला वडिलांवर खूप राग आला ……
परंतु त्याने आपल्या रागाला आवरून त्यांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली
बाबा मला माझी कार न देता हे रामायण दिले नक्कीच तुमच्या मनात काहीतरी असेल पण मी हे घर सोडून जात आहे ,मी तेव्हाच येईन जेव्हा मी स्वतः खूप पैसे कमवनार, आणि चिठ्ठी व रामायण तेथेच सोडून तो घर सोडून निघून गेला.
काही वर्ष निघून गेली …..
मुलगा हुशार होता लवकरच खूप श्रीमंत झाला ,लग्न करून ऐशो-आरामात राहू लागला,कधीकधी त्याला वडिलांची आठवण यायची तेव्हा त्याला वडिलांच्या गिफ्टची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती ,आई नंतर बाबांना कोण होतं ? मग माझी छोटीशी इच्छा का नाही पूर्ण केली हा विचार करूनच तो वडिलांना भेटण्याच टाळायचा,
एक दिवस त्याला वडिलांची खूप आठवण आली ,त्याने विचार केला ,आपण एका छोट्या गोष्टीसाठी बाबांशी नाराज झालो हे ठीक नाही,हा विचार करून त्याने वडिलांना फोन केला ,खूप दिवसांनी बाबांना फोन करतोय म्हणून धडकत्या अंतकरणाने फोन कानाला लाऊन ऐकू लागला ,त्याच वेळी पलिकडून नोकराने फोन उचलला आणि सांगितले मालकांचा दहा दिवसापूर्वी स्वर्गवास झालाय ,शेवटच्या वेळी तुमची खूप आठवण काढली आणि रडत रडत प्राण सोडला ,
जाता जाता सांगून गेले की माझ्या मुलाचा फोन आला तर सांगा ,आपला व्यवसाय सांभाळ .तुमचा काही पत्ता नव्हता म्हणून कळवता नाही आलं
हे ऐकताच मुलाला दुःखाचा खूप धक्का बसला ,दुखी मनाने तो आपल्या घरी निघाला
घरी पोहचताच वडिलांच्या खोलीत जाऊन त्यांच्या फोटो समोर रडत दाटलेल्या गळ्याने त्यांनी दिलेले गिफ्ट रामायण माथ्यावर लावले आणि खोलून बघू लागला
पहिल्याच पानावर लिहिले होते……
माझ्या प्रिय मुला,तु खूप खूप यशस्वी कीर्तीमंत हो ,तसेच तुझ्यावरा मी चांगले संस्कार देण्यासाठी तुला हे रामायणाचे पुस्तक देत आहे ….
वाचताना त्यातून एक बंद कव्हरचा लिफाफा खाली पडला त्यात एक चावी आणि गाडीचे भरलेले बिल होते
हे पाहून त्याला खूप दुःख झाले ,खाली बसून तो धाय-मोकलून रडू लागला .
आपण आपली मनपसंद भेट आपल्या पैकिंग मध्ये न बघताच चुकून गमावुन बसतो.
वडिल तर ठीक पण
देव सुद्धा आपल्याला अगणित भेट देतोय पण आपण अज्ञानाने आपल्या मनपसंत पैकिंग मध्ये नाही बघून गमावुन बसतो.
आपण आपल्या आई वडिलांनी प्रेमाने दिलेल्या कित्येक भेटवस्तुंच सन्मान करून त्यांना धन्यवाद द्यावं
कदाचित् आणि कोणताही मुलगा असाच आपल्या वडिलांच्या भेटी पासून वंचित राहू नये
अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४
Be First to Comment