Press "Enter" to skip to content

अरुण दत्ताराम म्हात्रे यांची “झाडे लावा -झाडे जगवा” ही लघुकथा

एक रोप मातीच्या कुशीत… (चित्र लघु कथा)

अवलोकन आणि खूप निरीक्षण केले त्या चिमुकल्या पवन ने. आपल्या अवतीभवती आणि दूरवर न्याहाळत होता तो परिस्थितीला. त्याच्या निरागस नजरेला हिरवळ, वृक्षवल्ली दिसतच नव्हती. दिसत होते धूर ओकणारे धुराडे, सिमेंट काँक्रेट ची बांधकामे, उजाड पठार-माळराने आणि धुराचा मुलामा चढवलेले काळेकुट्ट आकाश. कल्पनेने आणि वास्तवतेने त्याचा जीव गुदमरत होता. नैसर्गिक मोकळी शुद्ध हवा, मोकळा श्वास अर्थात प्राणवायू याचा अभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे तसेच मोठ्यांनी केलेली वृक्षतोड, नैसर्गिक हानी या सार्‍या गोष्टी चिमुकल्या पवन च्या लक्षात आल्या असाव्या. खेळण्याच्या वयात सुद्धा त्याच्याकडे इतकी कल्पकता होती. त्याला निळे आकाश आणि कापूस पिंजल्यासारखे पांढरे शुभ्र ढग, स्वच्छंदपणे हवेत उडणारी… किलबिल करणारी पाखरे, माळरानात गवत-चारा चरणारी गाई-गुरे, वाऱ्यासंगे सळसळणारी वृक्षवल्ली, खळखळत वाहणारे निर्झर, सकाळची सोनेरी किरणे, सायंकाळचा ढगांवर चा गुलाल उधळलेला लालिमा हे सारे पाहायचे होते.

जीवसृष्टी जगवायची तर आहेच. या विचाराने कृत्रिम प्राणवायू चे नळकांडे पाठीवर पेलत….
त्या चिमुकल्या ने दृढनिश्चय केला ….
अनं ———
एक रोप मातीच्या कुशीत रोवला…
जीवन-बाग फुलवण्यासाठी.. मोकळ्या श्वासासाठी !!

कथाकार- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई, मो.9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.