समूह संपादक मंदार दोंदे यांच्या मंदारस्कोप मधून घेतलेला OTT माध्यमांचा आढावा..
ओ टी टी च्या बारशाला येताय ना ???
मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे. ओटीटी हा शब्द मनोरंजन विश्वात पावलो पावली वापरला जातो. वृत्तपत्रे, मासिके, छापील माध्यमे तसेच आंतरजालीय विश्वात देखील ओटीटी या शब्दाने धुमाकूळ घातलेला आहे.
ओटीटी या शब्दाला योग्य मराठी शब्द अद्याप वाचण्यात ऐकण्यात आलेला नाहीय.
ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तारी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो.
आंतरजालावर आधारित आणि अद्याप तरी फार भौगोलिक किंवा सेन्सॉर निर्बंध नसलेलं असं हे नवीन विश्व असल्याने त्याला जालरंजन किंवा मुक्तरंजन किंवा मुक्तजालरंजन असे काहीतरी म्हणता येईल.
खरे तर Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन नाहीये. कारण ते इंटरनेटच्या माध्यमातुन आपण बघतो. satelite इंटरनेट उपलब्ध असले तरी ते अतिशय महागडे आहे (माझ्या माहितीप्रमाणे – जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी). आपण जे ईंटरनेट वापरतो ते मुख्यत: optic fibre वर अवलंबून आहे. याच्या केबल्स समुद्रतळातून फिरवलेल्या आहेत. satelite मधून येणारे मनोरंजन म्हणजे दूरचित्रवाहिन्या – म्हणजेच जुन्या काळचे मनोरंजन. ते आपल्यापर्यंत डिश अँटेना आणि सेट टॉप बॉक्स द्वारे पोहोचते
ओटीटी हे नाव खरेतर गंडलेले आहे. Over The Top या शब्दांतून काहीच कळत नाही. उगाचच हा शब्द माथी मारलाय.पण या संकल्पनेत internet (माध्यम) आणि streaming (आधी डाउनलोड करण्याची गरज नसणे – थेट बघता येणे) हे तांत्रिकदृष्टीने महत्वाचे. त्या अर्थाने YouTube ही ओटीटी मग Netflix , Prime , Hotstar ई व YouTube यांत फरक काय ? तर YouTube वर कुणीही वापरकर्ते चित्रफिती टाकू शकतात आणि अपवाद वगळता YouTube कडून त्यावर काही निर्बंध नाहीत. शेकडो प्रकारातल्या चित्रफिती YouTube वर आहेत. पण Netflix वा ईतर ओटीटी आपल्या चित्रफिती स्वतः टाकतात. त्यांचे प्रकारही काही मोजकेच आहेत (मालिका, चित्रपट ई)
त्यामुळे आंतरजालीय नियंत्रित प्रवाही असे हे स्वरुप आहे. एका अर्थाने Netflix वा ईतर ओटीटी या आंतरजालीय वाहिन्याच आहेत (सॅटेलाईट वाहिन्यांप्रमाणेच पण आंतरजाल अर्थात इंटरनेटद्वारे बघता येतात) म्हणून आंतरजालीय वाहिन्या किंवा जालीय वाहिन्या असे सुटसुटीत नाव कसे वाटते ?
यात काही मोफत आहे. MXPlayer सारखे तर काही अंशतः मोफत आहेत (Zee 5, Sony Liv) तर काही पुर्णतः सशुल्क आहेत
अगदी. प्रत्येक परकीय भाषेतील शब्दासाठी मराठी प्रतिशब्द प्रयोजिततांना दोन बाबींचा विचार व्हावा. पहिली, ही संकल्पना मूळ कुठून आली? ती आपली, आपल्या मातीतीलच असेल, तर मग मराठी सम्बोधन असणे उचित ठरावे. दुसरी, नवा शब्द सहजपणे बहुतांश मराठी जनांच्या तोंडांत बसेल का? तर, ह्याबाबतीत आपण थोडा पूर्वेतिहास पहावा– स्टेशन, प्लॅटफॉर्म, बस.. आसे अनेक परकीय शब्द आपण अगदी सहज रूळवून घेतलेत, त्यांना आपल्या जिभेला रूळेल असा बदल करून का होईना, तसे झालेले आहे. तेव्हा, ओ. टी. टी. जसेच्या तसे आपण मराठींत स्वीकारावयास काही अडचण नसावी.
व्हिडीयो लोकांपर्यंत पाठवणार्या ब्रॉडकास्ट कंपन्या, एका ट्रान्स्पॉन्डरवर, किती चॅनेल्स पाठवावयाची हे बर्यापैकी ठरवू शकतात. नव्वदीच्या दशकांत सुरू झाल्यापासून तंत्रज्ञान जसे विकसीत होत गेले, तशी ही क्षमता वाढू लागली.
पण हे थोडे अवांतर झाले. सॅटेलाईट्वरून, अथवा केबलवरून अथवा थेट लहरींतून प्रक्षेपण केले जाते ते लिनीयर ब्रॉडकास्ट पद्धतीचे आहे. म्हणजे ब्रॉडकास्टर जे जसे ठरवणार, त्याप्रमाणे, त्या त्या वेळेस तो तो कार्यक्रम ‘प्रक्षेपित’ केला जाणार. प्रेक्षकांना तो, बहुतांश, तेव्हाच बघावा लागणार. आणी तेही त्यांचा विवक्षीत सेट टॉपच्घा वापर करूनच. — अर्थात, एकाच जाही, घरांत/ बारमधे वगैरे. स्ट्रीमींगमुळे आता प्रेक्षकांना, काहीही, कुठेही पहाता येते. (Anywhere, anytime).
ओव्हर द टॉप– म्हणजे जालाच्या अस्तित्वात आसलेल्या पायाभूत सुविधांचा, जसाच्या तसा वापर करून घेऊन त्यावरून स्ट्रीम (प्रवाह) नेणे. म्हणजे, निम्न स्तरीय सुविधा (सेल नेटवर्क, ब्रॉडबँड नेटवर्क) आहेत तश्याच्या तश्या, त्यांत काहीच बदल करण्याची जरूरी न लागता, इतर डेटा (जसे की, ई- मेल्स, फाईल शेयरींग, इत्यादी पूर्वापार अस्तित्वात असलेल्या व्यवस्था) जसा त्यांजरून नेला जातो, त्याचप्रमाणे, हे स्ट्रीम्सही त्याजवरून वाहिले जातात. हे ओव्हर द टॉप (ऑफ लोव्हर लेव्हल सिस्टीम्स, प्रोव्हायडेड बाय सर्विस प्रोव्हायडर्स).
थोडे खोलांत शिरूर सांगायचे झाले तर, इतर, ‘पारंपारीक डेटा’ एका स्थळाहून दुसर्या स्थळावर नेण्यासाठी जी निम्न स्तरीय यंत्रणा (IP based) अगोदरच उभारलेली गेलेली आहे व वापरांत आहे, तिचा तसाच्या तसा वापर करून. त्यावरून व्हिडीयो स्ट्रीम नेणे. अर्थात, व्हिडीयो स्ट्रीम आता आनेक अर्थांनी, इतर डेटासारखाच झाला….असो तूर्तास तरी याला मराठी नाव शोधण्याच्या भानगडीत पडण्याची गरज नसल्याचे वाटू लागले आहे.








Be First to Comment