Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

कशाला उगा

कशाला उगा कशाला उगा ते जुने आठवावे?जुने ते परंतू नव्याने दिसावेअसे का घडावे? न काही कळावे?जसे आज सारे पुन्हा शांत व्हावे.. कशाला हसावे? कशाला रडावे?जुने…

माय मराठी

माय मराठी माझ्या भाषेची गं कौतुकेशब्दा शब्दातुनी मांडलीबोली भाषेच्या कोदणांनीकाया तिची गं ती नटवली लावुनिया मातीचा टिळागौरोविली गं माय मराठीमेळवुनी जन मनास अवघीरोवली अभिमानाची काठी…

ओढ…

ओढ… तुला भेटण्याची ओढ लागली असे जीवातुला पाहण्यास जीव होतोय वेडा पिसा. आठवणीने तुझ्या जीव सुखावतोतुला भेटण्याची ओढ वाढवितो. जाणीव तुझी श्वास झालाय माझा,अनुभवला स्पर्श,…

स्पंदने

स्पंदने कशी सावरू आवरू मी मनाला तुझी सावलीही दिसेना जिथेकधी पाहता दर्पणी मात्र मी बिंब माझे दिसे ना मला का तिथेतुला स्पर्शता मी अशी वागते…

झुगारता बंधने ही

झुगारता बंधने ही झुगारता बंधने हीआसमंती धाव गेलीगगन झाले ठेंगणेकल्पना ती धन्य झाली…. सरस्वती जरी नावाचीशिकण्याची सोय नव्हतीसावित्री ने कष्ट झेललेझाली शिकून तू जाणती…… वारसा…

मुर्दाडांचा समाज

मुर्दाडांचा समाज हा मुर्दाडांचा समाजती शोषितांची झोपडीसमाजाच्या डोळ्यात धूळ फेकतखुर्चीतल्यांची सतराशे साठ लफडी दररोजचेच समाजव्यवस्थेवर बलात्कारकधी होणार समाजमनाला साक्षात्कारअस्तिनातील निखार्‍यांनी तोवरजाळून खाक केली झोपडी अनिष्ट…

गज़ल.. वेदनेची

गज़ल.. वेदनेची वेदनांशी बोलते मी फार हल्लीकोडगे भलते तुझे ते वार हल्ली आजही बघ ना कळाले दैव त्यांनादाटलेला केवढा अंधार हल्ली दिर्घ पोथी,शब्द अवघड टाळतानावाचते…

सिटी बेल लाइव्ह /काव्यकट्टा

वाचा श्री.नंदकुमार मरवडे यांची असावा सुंदर गाव आमुचा या विषयावरील प्रबोधनात्मक कविता असावा सुंदर गाव आमुचा असावा सुंदर गाव आमुचापरिसर नसावा अस्वच्छनसावेत ढिग केरकच-याचेसारे कसे…

अभिसारिका

अभिसारिका कितीदा नव्याने तुला भेटताना नव्यानेच तू भेटशी का पुन्हा,तुझ्या दृष्टीची मोहिनी काय सांगू कसा जाहला सांग माझा गुन्हा ? तुला भेटण्याचे, तुला पाहण्याचे तुला…

नाते

नाते कसले नाते कुठले नातेजरा ताणले तुटले नाते बराच काळ जपले होतेशब्दही होते अर्थही होते स‌ंवादाविण सारे व्यर्थ होतेओढ असूनही समजले ना ते.. वेळ गेली…

♪♪जीवन संगीत♪♪

♪♪जीवन संगीत♪♪ संगीताचा आयुष्याशीजवळचा संबंध असतोअंतर्मनात संगीत लेवुनमनुष्य जन्माला येतो मंद्र,मध्य,तार तिन्हीसप्तकात बोलतांनायोग्य आवाज लागायलाहवा काहीही सांगतांना जीवन रुपी संगीताचारियाज कायम करावाविविध भावरुपी रागांचाअभ्यास सतत…

सुख

सुख काहूर मनातले,शब्दातुनी झिरपलेवेड किती सुखाचे,बळेच पांघरले अवचित परिमळ रातराणीचावेड लावून गेलाकुठे मालकौंस गुंजलाक्षण सुखाचा मी कवटाळला रम्य वाट रानातलीसखी संगे पाऊले टाकलीगूज अंतरीचे कथितानासुखाचीच…

पोतराज

पोतराज अंधश्रद्धेची डोक्यावर टोपलीटोपली सारी अंधारानं भरलीपाठीवर लेकरं शांत झोपली भटक्या-विमुक्तांची परवड झाली मरीआई भोवती धरुन फेरपोतराज खेळे आसुडांचा खेळमळवट भाळी हळदी-कुंकवाचास्त्री वेशातील जटाधारी देवीचा…

वेदना

वेदना नुसते ते भास होतेकी होती भावनाबोलके ते श्वास होतेकी फक्त याचना गुंतलेली मीच होतेकी होती साधनादेखले ते काय होतेकी फक्त योजना राहिलेली प्रीत होतीकी…

प्रजासत्ताकाच्या लघुकथा

प्रजासत्ताकाच्या लघुकथा प्रसंग 1 हे 26 जानेवारी /15 अॉगस्ट असेच विकेंडला जोडूनच यायला पाहिजेत. म्हणजे कसे मस्तपैकी ट्रिपला जाता येते राव! दोन मित्रांमधला संवाद प्रसंग…

मन

मन मन अथांग सागरलाटा विषयांच्या उसळती फारअव्यक्त भावना दाटताकिनारा राही दूर मन सोसाट्याचा वाराक्षण ही न मिळे त्या थाराकोण अडवू शकेल तयालाव्यर्थ ची भासे हा…

शब्द

शब्द शब्दच माझे जीवाचे जीवनशब्दच माझे अंतरीचे मन मनांत गुंफता शब्दांचा शेलाशब्दांची बाग केतकी भाला शब्द जणूं शारदा नुपूरशब्द सूर , मनी हुरहूर शब्द शब्दांस…

बालपण

बालपण शुभ्र झरे अन घनराई तीअंगणामधले शीतल शिंपण ।कवडशातल्या किरणांमधुनीपुन्हा गवसले रम्य बालपण ॥ खुशालचेंडु वाटांमधुनीअधीरतेने बागडले मी ।झेलत गेले ओंजळीतुनीआकाशाचे गूढ निळेपण ॥ झ-यामधुनी…

आपले एक स्वप्न………. मी आणि तू

आपले एक स्वप्न………. मी आणि तू आपले एक स्वप्न………………..स्वप्नाला लाऊया नवे पंख ऊडू दे आपल्या अंकुरालाघडेल तो,घडवेल तो, आपले स्वप्न साकार करेल तो.चल त्याला साथ…

जन्मोजन्मीचा सोबती

जन्मोजन्मीचा सोबती माझा जन्म तुझ्या साठीच आहे रेतुझ्या भेटीची आस मनी जपली रेलहान पणीच्या भातुकलीच्या खेळातली राजा राणीची जोडी आपली रेतू माझा निरोप घेताना गहिवरलेला…

ताई

ताई तायडे तुलाच गं आताकसे विचारू कळत नाहीकवितेसाठी आता मलाका गं शब्द सुचत नाही चारोळ्या सुचतात काहीकविता मात्र होत नाहीतुझ्याविना शब्दालाहीकाहीच गंध उरत नाही पाहतो…

ती चाचणी परीक्षा…..

ती चाचणी परीक्षा….. पर्वा अचानक एक ऑर्डर निघालीofficial visit साठी अँटीजेन चाचणी करायची वेळ आलीअन काय सांगू, जीवाची त्या इतकी घालमेल झाली ! काय करावे,…

अवतार

अवतार खरच असे घडेल का?स्वप्न सत्यात उतरेल का?एक वचनी एक बाणीराम जनी दिसेल काय?प्रेम त्याग भक्तीची हीओळख नवीन होईल काय?भरकटलेल्या जनास पुन्हासत्य मार्ग दिसेल काय?खरच…

कर्ण

कर्ण सरितेच्या हाती तुजला अर्पूनप्रेमबंधही सहजी तुटलाप्रारब्धाच्या पटलावरतीमार्ग एकला सहज साधीला !!१!! दोन अनामिक त्या तीरावरपदर पसरुनी बसले होतेओंजळीत अधिरथ राधेच्याजीवन जणु हे फुलले होते…

तिळगुळ

तिळगुळ शब्दांचेच तीळ,शब्दांचाच गूळ,स्नेहाचे हे मूळ,शब्दातीत! सत्य तरी गोड,बोलणे कठीण,सैल होई वीण,नात्यातली! संक्रांत निमित्त,स्नेह हाच हेतू,उभारावे सेतू,मनोमनी! सौहार्द्राएवढे,विधायक काय?पाण्यावरी साय,येऊ शके! कोरडा न व्हावा,प्रेमाचा ओलावा,अभंग…

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता “लोकनेते दि.बा.पाटील”

लोकनेते- दि.बा.पाटिल ! सूर्याचे 'ते' जणू तेज आगळे 'दिबा' जासई-रायगडात जन्मले समाज कार्यात रममाण झाले चंदनापरी निस्वार्थी झिजले... कधी न प्रकाश-तिमिर पाहिला 'हिरा' सदा तो…

मास्क

मास्क नाकावरचा घट्ट मास्क सोडवत नाहीकधी घेतला होता शेवटचा मोकळा श्वास?नाहीच आठवत तेही तशी आता श्वास घ्यायचीच भीती वाटू लागलीयश्वास म्हणजे? – शुद्ध हवा आत…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कस्तुरी गंध

कस्तुरी गंध नक्षत्रवेलीवरच्या कळ्यांचेफुलवले काशीसरांनी फूलपडते ललितलेखनाची इथेसमस्त सारस्वतांनाच भूल उगवत्या काव्यलतिकांचीबरसतेय लेखणीच झरझरविषय लेखनाचा रोमँटिकउतरतो कागदावरी सरसर नसते ठावूक कस्तुरीमृगासयेतोय कुठून हा कस्तुरीगंधसारस्वतांच्या लेखणीचाचपसरलाय…

नव वर्षाचा संदेश

नव वर्षाचा संदेश दिवस जातात,वर्ष सरतात,पृथ्वी फिरते सूर्याभोवती,कालचक्र अविरत धुमते,थांबत नाही कोणासाठी जुने वर्ष मावळते,चांगले वाईट देऊन,करावे तसे भरावे,धडा जाते शिकवून दोष नाही कोणाचा,आपलेच कर्म…

ते निष्पाप_जीव

ते निष्पाप_जीव उगवलेली कळी उमलण्या आधीच जळालीनिष्पापांचा जीव घेऊन इहलोकी वळाली सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वाजलेलेच तीनतेराकधी संपणार हा सरकारी अनास्थेचा फेरा मुर्दाडांचा समाज खोटी आसवे…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे माझेआसावले दोन नैनातव मिलनाची आसतुझ्या प्रीतीची मैना केली प्रीत तुझ्यावरघातला मनास आवरसख्या असला दुरावातू येऊनी मज सावर साद घालते…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : वडीलधाऱ्यांचा आदर

वडीलधाऱ्यांचा आदरराखा तुम्हीं त्यांचा मानझिजवली त्यांनी कायाकरा कार्याचाही सन्मान जास्त झेलेले पावसाळेअनुभवच त्यांना जास्तत्यांच्या छत्रछायेखालीराहाल तुम्ही चुस्तफुस्त वडीलधाऱ्यांना कधीहीनकाच तुम्ही हो दुखवूटक्केटोणपे खाल्ले जगीगोड बोलण्यांने…

नवी पालवी…

नवी पालवी… वठलेल्या त्या, झाडावरतीनवी पालवी, अवचित फुटलीत्यालाही हे , उमगत नाहीजगण्याची ही, जिद्द कुठली सुकलेल्या या, देहावरतीमायेची ती, ओल जाणलीआशेची मग, छान लकेरफांदीमधुनी, नवी…

भैरवी

भैरवी थांबायचे कुठेकळायला हवेवेळीच भैरवीचे सुरछेडायला हवे संपु नये वाटतांनामैफिलीची सांगतालावुनी जाते हुरहुरभैरवीची स्वरता योग्य अशा काळीजर झाली सांगतामगच नवं निर्मितीचीमनामनात उत्सुकता सूर्यास्त फक्त त्यादिवसा…

शेतकरी

शेतकरी माणूस तो साधाराबतो लोकांसाठीतो काळ्या मातीत सदा, कसदार जमीन हीचत्याची माऊली,उत्तम प्रतीची लागवडकरून सर्वांचा आरोग्याचीकाळजी करतोपावलो पावली, सतत कष्ट करतानाऊन वारा पाऊसघेतो अंगावरी,पणत्याची काळजीकोण…

ती रात्र

ती रात्र मनी अंतरी तूच असावातुझ्या विना नकोसे सारेप्रेम बंध तो जुना असे जरीनवाच भासे बकुळी परी अधीर होते रात्रच मग तीतुझ्या सवे ते मूक…

सावित्री तू नसतीस तर…

सावित्री तू नसतीस तर… सावित्री तू नसतीस तर हातात असती फुंकणी . आली नसती लेखणी. सावित्री तू नसतीसतर डोईवर हंडा .आणि बंद झाला नसता हुंडा.…

सलाम

सलाम जाणाऱ्या२०२० वर्षाला सलामयेणाऱ्या२०२१ वर्षाला सलाम2020 खूप काही शिकवून जाते2०२१ उद्याची स्वप्ने दाखवू पाहतेसलाम सलाम सलाम कोरोना ला सलामचक्रीवादळाला सलामअतिवृष्टी ला सलाम आणिबर्फवृष्टीलाही सलामसलाम सलाम…

स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे सरले सरले वर्ष कसोटीचेसावध स्वागत करुया नव्याचे. खूप गमावले, शिकलोही खूपआता करोनाचे वाजवू या सूप. चुकताच कधी क्षमाही मागू यास्वभावात थोडा बदल करु…

Autobiography Of 2020

Autobiography Of 2020 People say I was bad year.I spreaded negativity and fear. I taught you what is meant by cleanliness.and I also showed some…

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट पुन्हा एकदा थर्टीफर्स्टगुलाबी थंडीत, शेकोटी भोवतीजुन्याला परत पाठवतनवीन वर्षाचे स्वागत! जुन्या वर्षाचे सिंहावलोकनतर नव्या वर्षाचे संकल्पनिरनिराळ्या नेमांची उजळणीनंतर मात्र सगळंच अळवावरचे पाणी!…

मनोव्यथा

मनोव्यथा अहो दसरा गेला दिवाळी गेलीसख्या मी तुमची किती वाट पहिलीतुमची स्वारी काही नाही बाई आलीअशाने माझा जीव होतोय वरखाली तुमच्या वाटेकडे मी डोळे लावून…

दत्तजयंती

दत्तजयंती अनादि अनंत त्रैलोक्याचा सगुणआधारअत्रिमुनींच्या सदनी जन्मे श्रीदत्त अवतार।।धृ।। पौर्णिमेचा पावन दिन हामार्गशीर्ष मासदत्तजयंती उत्सव मेळाभक्ती सहवासवसुंधरेने धारण केला नूतन शृंगार||१|| ब्रम्हा-विष्णु-महेश तत्वअवधूत मूर्तीवात्सल्याने हर्षित…

मला वाटते

मला वाटते मला वाटते,घ्यावी अशी ही उंच भरारीस्वच्छंद पक्ष्यासारखी स्वारीक्षितीजाच्या पलीकडली सारीपहावी स्वच्छंद दुनिया न्यारी मला वाटते,घेऊन गिरकी आनंदानेमंत्रमुग्ध व्हावे संगीतानेसुरांच्या या दुनियेत रमावेस्वप्नपूर्तीचे ध्येयं…

चहा

चहा संसाराच्या उकळत्या पाण्यातघालू अहंकाराची चहा पावडरस्नेहाची साखर शिस्तीचं आलंअहंकार गळून येईल रंग सुरेखसाथोडं आपुलकीचं, मैत्रीचं दूधअति नको उकळायलाकडू होईल चवसमजुतीने घालू आवरक्रोधाच्या उकळण्यालाजिव्हाळ्याच्या कपातगाळून…

मी आणि माझी छाया

मी आणि माझी छाया मी आणि माझी छायादोघीही असतेच जवळएकमेकांवर प्रेम असतंसाथ कधी छोडत नाही….. अचानक कुठून तरीढग येतो अलगदछाया नाहीशी होते….. मोकळ्या आकाशातपरत येते…

वंदन कोव्हिड योद्ध्यांना

वंदन कोव्हिड योद्ध्यांना कोरोना राक्षसाशी लढण्या सज्ज, कोव्हीड योद्धा म्हणावे की कर्मवीर,जन-सेवेला ऐसे भिडले सारे, जसे सैन्य लढते तळहाती घेऊन शीर ॥ शस्त्रसज्ज जरी असलात…

खेळ आगळा

खेळ आगळा सजविता मी नेहमी स्वप्नी मळा    आसवांना का असा माझा लळा । जा ,अशी छेडू नको वीणा अता मी ,गहाणच ठेवला गाता गळा…

मी शोधत गेलो

मी शोधत गेलो मी शोधत गेलो, तुलाच झाडाखालीअन तुझी आसवे, दवबिंदुसम झाली ।त्या दवबिंदुसम, झाले हे अनुबंधमी शोधत गेलो, तिथे हरवला गंध ॥ ॥ मी…

गुज…

गुज… मावळतीचा दिनकर सांगे गूज मनीचे अवनीलायेईन सत्वर पुन्हा प्रभाती जीवन देण्या सृष्टीला चार प्रहर ते विरहाचे मन भरून येई श्वासालामंद उसासे रजनीसंगे खीळ पुन्हा…

Mission News Theme by Compete Themes.