झुगारता बंधने ही
झुगारता बंधने ही
आसमंती धाव गेली
गगन झाले ठेंगणे
कल्पना ती धन्य झाली….
सरस्वती जरी नावाची
शिकण्याची सोय नव्हती
सावित्री ने कष्ट झेलले
झाली शिकून तू जाणती……
वारसा तुला जिजाऊचा,
राणी झाशीची लक्ष्मीबाई
आता जरी तू झाली मुक्त
तरीही गर्भात मरते बाई…..
उचल आता तूच पाऊल
अन्याय होई कुणावर
दुर्गा जागुदे तुझ्यातली
नकोच साहू अत्याचार…..
सर्व क्षेत्रात अग्रेसर तू
रणांगणी अन् राजकारणी
हक्काला परी वंचित असती
कितीतरी आपुल्या बहिणी…..
सावित्रीच्या लेकी आपण
चालवू पुढे वारसा तिचा
झुगारताना बंधने ही
विसर न पडो कर्तव्याचा
सौ. विजया चिंचोळी.
खारघर, नवी मुंबई.







Be First to Comment