Press "Enter" to skip to content

रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅन्ड ज्युनि. कॉलेजचेतालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

प्रतिनिधि आवरे ( हिमांशू पटेल) –

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा अधिकारी रायगड आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुलातील रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅन्ड ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अॅन्ड कॉमर्स , मु. आवरे, ता उरण, जिल्हा रायगड या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सप्टेंबर -ऑक्टोबर २०२६ मध्ये संपन्न झालेल्या तालुकास्तरीय सांघिक स्वरूपाच्या क्रीडा सामन्यात १४ व १७ वर्षाखालील मुले गटात खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही संघाची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली. १७ वर्षाखालील मुले गटात जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. १७ वर्षाखालील मुले गटात खो खो स्पर्धेत काव्य सुशांत गावंड याचा मैदानी निवड चाचणीत समावेश करण्यात आलेला आहे तसेच १४ वर्षाखालील मुली गटात कबड्डी व खो खो स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

तालुकास्तरीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी वैदेही योगेश घरत १७ वर्षाखालील, ६८ किलो खालील वजनी गटात कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. १९ वर्षाखालील मुले गटात १५०० मीटर धावणे स्पर्धेत राज म्हात्रे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील १७ वर्षाखालील मुली गटात गौरी घनश्याम म्हात्रे या विद्यार्थीनीने १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक व २०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय मिळविला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षाखालील मुली गटात जान्हवी पराग गावंड १०० मीटर व १७ वर्षाखालील मुली गटात १०० मीटर धावणे स्पर्धेत निधी बाळू गावंड तृतीय पारितोषिकाच्या विजेत्या ठरल्या.

१४ वर्षाखालील मुले गटात तालुकास्तरीय कॅरमस्पर्धेत श्रीयांश हर्षद भुरे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत १७ वर्षाखालील, ५० किलो खालील वजनी मुले गटात कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी दीप धनेश्वर म्हात्रे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर विद्यार्थ्याची मुंबई विभागीय स्तरावर निवड झाली आहे. याच स्पर्धेत १४ वर्षाखालील, ४४ किलो खालील वजनी मुली गटात आरोही संतोष म्हात्रे तृतीय क्रमांक, १७ वर्षाखालील, ५७ किलो खालील वजनी मुली गटात वैष्णवी गुरुनाथ गावंड द्वितीय क्रमांक आणि १७ वर्षाखालील, ४४ किलो खालील वजनी मुली गटात दिक्षा लक्ष्मण पाटील तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या स्पर्धेतील सर्व यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, खानिनदार डॉ. सुखदा चिराटे, प्राचार्या मेघा म्हात्रे , डॉ.समृद्धी मोरे, रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅन्ड ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.