Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषद शाळा डेरवली येथे ‘आकाशकंदील कार्यशाळा’ संपन्न; विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग

पनवेल – पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा डेरवली येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने विविध आकर्षक आकाशकंदील बनवण्याचा आनंद घेतला.

शाळेत आयोजित या उपक्रमाला बालभारती कार्यशिक्षण समितीचे सदस्य श्री.विद्याधर म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,त्यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनवण्याचे तंत्र,त्यामागील संकल्पना आणि सुलभ पद्धती यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.श्री.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मुलांनी अत्यंत मन लावून सुंदर आकाशकंदील तयार केले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कृतिकौशल्याला आणि नवनिर्मिती क्षमतेला उत्तम वाव मिळाला तसेच पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून बनवलेल्या या आकाशकंदीलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यंदा ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’साजरी करण्याचा मोलाचा संदेश दिला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी भोसले,शिक्षक रवींद्र रोटकर,विजेता पाटील वर्षा पाटील उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.