Press "Enter" to skip to content

बोरगाव येथील घराला अचानकपणे भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली ; पेण नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील यांची तात्काळ बोरगाव येथे भेट

पेण (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या बोरगाव गावातील नारायण पाटील यांच्या घराला अचानकपणे आज लागलेल्या भीषण आगीत घराचे पूर्णतः नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र याबाबतची माहिती पेण नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ बोरगाव येथे धाव घेतली.

तालुक्यातील बोरगाव येथे राहणारे नारायण रामभाऊ पाटील यांच्या घराला आज सायंकाळी ४.३० ते ४.४५ यादरम्यान अचानकपणे आग लागली आगीचा भडका पाहता सर्वत्र भीती निर्माण झाली होती अशातच येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून येथील इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून तातडीने पेण अग्निशमन दलाला पाचरण केले दरम्यान आगीची माहिती पेण नगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ बोरगाव येथे धाव घेत पेण तहसील कार्यालयासह संबंधित तलाठी, कोतवाल, एमएसईबी अधिकारी यांच्यासह पेणअग्निशमन दलाला आमंत्रित करून येथील आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.त्यामुळे नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या कार्य तत्परतेमुळे सर्वत्र त्यांचे कतुक होत आहे. यावेळी उपस्थित अधिकारी वर्गासह ग्रामस्थ उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.