Press "Enter" to skip to content

दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल ; साईनाथ पवार यांना डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित !

पनवेल / प्रतिनिधी

दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने कार्य करणारे साईनाथ पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत लुइझियाना रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्याकडून दिव्यांग क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून पुणे येथे सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा हा गौरव संपूर्ण दिव्यांग क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

विशेष म्हणजे, साईनाथ पवार हे स्वतः दिव्यांग असूनही त्यांनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी, विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य केले आहे. दिव्यांगांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, विविध शैक्षणिक व प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, तसेच दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी विविध शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपले ज्ञान आणि कौशल्य अधिक समृद्ध केले आहे. त्यांच्या याच सेवाभावी कार्याची आणि कर्तृत्वाची दखल घेत त्यांना डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले.
याच गौरवशाली कामगिरीबद्दल भारतीय अवॉर्ड कौन्सिलच्या वतीने साईनाथ पवार यांना पुणे येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

एका दिव्यांग व्यक्तीने स्वतःच्या संघर्षातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करत मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या दुहेरी सन्मानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.संघर्षाला जिद्दीची जोड आणि सेवेला समर्पणाची साथ मिळाली की यशाची शिखरे गाठता येतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे साईनाथ पवार!

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.