Press "Enter" to skip to content

गज़ल.. वेदनेची

गज़ल.. वेदनेची

वेदनांशी बोलते मी फार हल्ली
कोडगे भलते तुझे ते वार हल्ली

आजही बघ ना कळाले दैव त्यांना
दाटलेला केवढा अंधार हल्ली

दिर्घ पोथी,शब्द अवघड टाळताना
वाचते मी फक्त आता सार हल्ली

द्यायचे जे तेच जे मिळते मनाला
रोकडा करते असा संसार हल्ली

मी उन्हातान्हात फिरते रोज आता
लावते मी सावलीचे दार हल्ली

जाणते ना मी गझल ना काफिया ही
तो समजतो बघ मला नादार हल्ली

वाट बघ, सांभाळ मुल्ये संस्कृतीची
मोकळा झालाय रे व्यभिचार हल्ली

स्मिता गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.