Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त लाडू वाटप

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोज्यात भव्य वृक्षारोपण अभियान शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल, दि. १३ : युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते व वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे डिजिटल बॅनर किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कमलगौरी पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने तळोजा येथील संस्थेच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे व इतर पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना बबनदादा पाटील म्हणाले, “झाडे लावणे हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. पुढील वाढदिवसापर्यंत ही झाडे वाढलेली आणि फळधारणा केलेली पाहणे हा आमचा संकल्प आहे.”

विद्यार्थ्यांनीही झाडांच्या निगा राखण्याचा निर्धार व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक उपक्रमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरात अशा विधायक उपक्रमांची चर्चा रंगली आहे.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते व चेअरमन बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, शहरप्रमुख प्रदीप केणी, विभागप्रमुख मिथुन मढवी यांच्यासह एस.व्ही. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राहुल डोंगरगावकर, बबनदादा पाटील फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज अग्निहोत्री, बी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अक्षय मेश्राम, प्राचार्य अर्चना हिवसे, प्राचार्य प्राची गाडे, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.