Press "Enter" to skip to content

दरेकर-दळवींचे खंदे समर्थक; वरळीत भाजपला बळ मिळणार


संदीप मालप यांची भाजप वरळी वॉर्ड १९८ च्या महामंत्रीपदी नियुक्ती

महाड : रघुनाथ भागवत

महाड तालुक्यातील चिंभावे, हळदवणेवाडी गावचे सुपुत्र आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते संदीप मालप यांची भाजप वरळी विधानसभा वॉर्ड क्रमांक १९८ च्या ‘महामंत्री’ (वॉर्ड सरचिटणीस) पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

वॉर्ड अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी संदीप मालप यांचे सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, दांडगा जनसंपर्क आणि विविध संस्थांमधील योगदान लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. भाजप मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार यांच्या हस्ते मालप यांना नुकतेच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

संदीप मालप हे सध्या चिंभावे हळदवणेवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे सल्लागार तथा खजिनदार, साई मिलन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष आणि साई भक्त मंडळ वरळीचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत.

आमदार प्रवीण दरेकर, दक्षिण मुंबई भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गमरे आणि रायगड जिल्हा उपाध्यक्ष स्व.जयवंत दळवी यांचे खंदे समर्थक म्हणून मालप यांची ओळख आहे. या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दीर्घकाळ पक्षाचे काम केले आहे.

या नियुक्तीबद्दल बोलताना संदीप मालप म्हणाले, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मोलाचा आहे. केवळ पद मिळवणे हा हेतू नाही. वॉर्डातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहोचवणे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. वरळी भागात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन.”

त्यांच्या या निवडीमुळे मुंबईतील वरळी परिसरासह महाड तालुक्यातील मूळ गावी आनंदाचे वातावरण आहे. साई भक्त मंडळ आणि साई मिलन को. ऑफ. हो. सोसायटी, चिंभावे हळदवणेवाडी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सध्या सर्व स्तरातून मालप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.