Press "Enter" to skip to content

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट
गुलाबी थंडीत, शेकोटी भोवती
जुन्याला परत पाठवत
नवीन वर्षाचे स्वागत!

जुन्या वर्षाचे सिंहावलोकन
तर नव्या वर्षाचे संकल्प
निरनिराळ्या नेमांची उजळणी
नंतर मात्र सगळंच अळवावरचे पाणी!

बारीक होण्याचा निर्धार
नेहेमीच करते पार्टीत मारत ताव
पाच वर्षापूर्वी घेतलेल्या पॅन्टमध्ये
हे शरीरा! ह्या वर्षी तरी माव!

किती करायचे डायट कन्ट्रोल
सगळेच उपाय ठरती फोल
जाऊदे मेलं म्हणत, नेहेमीच जातो तोल
म्हणूनच म्हणते, आकर्षक दिसते शरीर गोल

उद्या सकाळी नक्की जाईन
ही मऊशार दुलई सोडवत नाही
वॉकला जायला माणूसच नेमते
अन जिमसाठी एखादी मुलगी शोधते

नवीन वर्षी सगळीकडे चालतच जाईन
आजच्या दिवस गाडी, उद्या चालवणार नाही.
म्हणतात, खराब होतं मशीन जर वापरले नाही.
नको बाई,नंतरचा खर्च परवडणार नाही.

डिनर नंतर शतपावली
करणार तरी कशी?
सीरिअल मिस झाली तर रिपीट टेलिकास्ट ही नाही
मागेपुढे चालले तरी खूप झाले बाई

पुन्हा एकदा थर्टीफर्स्ट
गुलाबी थंडीत, शेकोटी भोवती जुन्याला पाठवण्याची घाई
नव्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाही.

विनया वाळिंबे, कामोठे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.