वंदन कोव्हिड योद्ध्यांना
कोरोना राक्षसाशी लढण्या सज्ज, कोव्हीड योद्धा म्हणावे की कर्मवीर,
जन-सेवेला ऐसे भिडले सारे, जसे सैन्य लढते तळहाती घेऊन शीर ॥
शस्त्रसज्ज जरी असलात तुम्ही लढायचे कोणाशी ते काही कळेना,
हजारो खून करून सुद्धा मोकाट, अजूनही फिरतोय हा खूनी कोरोना॥
वेळ नाही, काळ नाही, कोरोनाच्या धास्तीने घराशी पण तुटले नाते
मनावर दगड ठेवून तुमची फौज, कसे अचूक कर्तव्याचे पालन करते॥
दिवाळीत हे संकट विसरून जेंव्हा, सकलजनानी केली आतिषबाजी,
तुम्ही मात्र केला अखंड सेवा-यज्ञ, लावून आपुल्या प्राणाची बाजी ll
आम्ही वंदन करतो तुमच्या कर्तुत्वाला, आणि प्रणाम तुमच्या जिद्दीला,
म्हणून शुभेच्छांसह येऊ तुमच्या दारी, साज चढवाया येत्या नववर्षाला॥
सफल होऊ दे हा सेवा-यज्ञ तुमचा, निरोगी होवू दे भारत पूर्वीसारखा,
इडा-पीडा लवकर टळो कोरोनाची, हीच नम्र प्रार्थना त्या गण नायका॥
गिरीश समुद्र, नवीन पनवेल. संपर्क :98335 66120








Be First to Comment