Press "Enter" to skip to content

नव वर्षाचा संदेश

नव वर्षाचा संदेश

दिवस जातात,वर्ष सरतात,
पृथ्वी फिरते सूर्याभोवती,
कालचक्र अविरत धुमते,
थांबत नाही कोणासाठी

जुने वर्ष मावळते,
चांगले वाईट देऊन,
करावे तसे भरावे,
धडा जाते शिकवून

दोष नाही कोणाचा,
आपलेच कर्म भोवते,
ध्यास सतत नाविन्याचा,
निसर्गाशी नाळ तुटते

सांगते आपली संस्कृती
कृतगन्य रहा पंचभूताशी,
ज्याने आपणास घडवले,
करा स्मरण दरदिवशी

जो चालवतो ब्रम्हांडास
त्याच्याशी नको शर्यत,
तो आहे सागर तर,
आपण तळातील कंकर

निसर्ग व आपण ,
हातात हात धरू,
जीवनाची ही वाटचाल ,
संगे त्याच्या करू

व्यर्थ हा अहंकार,
नको ईर्षा -द्वेष ,
वाटू प्रेम,शांति , समाधान ,
हाच नववर्षाचा संदेश

विजया करंडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.