गुज…
मावळतीचा दिनकर सांगे गूज मनीचे अवनीला
येईन सत्वर पुन्हा प्रभाती जीवन देण्या सृष्टीला
चार प्रहर ते विरहाचे मन भरून येई श्वासाला
मंद उसासे रजनीसंगे खीळ पुन्हा ती स्वप्नाला
आठव सारे कातरवेळी पुन्हा नव्याने जोडीला
कंठी येई सहज मारवा, हुरहूर साऱ्या देहाला
साज लेवूनी श्रुंगाराचे जीवहि मग तो आतूरला
आगमनाची वाट पाहता सूर नव्याने सापडला
प्रभात समयी पूर्व दिशेला आसमंतही मोहरला
मिलन करण्या अवनीसंगे सूर्य क्षितिजावर आला
युगे लोटली चालत आहे खंड नसे या चक्राला
पळंही गेली घटका जाती सूर्य सावरे अवनीला
©समीर खरे, पनवेल
8879737388








Be First to Comment