Press "Enter" to skip to content

खेळ आगळा

खेळ आगळा

सजविता मी नेहमी स्वप्नी मळा   

आसवांना का असा माझा लळा ।

जा ,अशी छेडू नको वीणा अता

मी ,गहाणच ठेवला गाता गळा

आज रिमझिम बरसत सय वसे मनी

प्रेम अंकुर रूजला तो  कोवळा !

कैफ कसला आरुढ मनावर असा

 रंग ऋतू खेळ खेळी आगळा  

टाळ मृदंग दुमदुमते मंदिरी  

पाहतो कोण परि भक्ती सोहळा   
 संगीता देशपांडे, नवीन पनवेल 

One Comment

  1. Karkhanis Hemachandra Prabhakar Karkhanis Hemachandra Prabhakar December 24, 2020

    कविता सुंदर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.