ओढ…
तुला भेटण्याची ओढ लागली असे जीवा
तुला पाहण्यास जीव होतोय वेडा पिसा.
आठवणीने तुझ्या जीव सुखावतो
तुला भेटण्याची ओढ वाढवितो.
जाणीव तुझी श्वास झालाय माझा,
अनुभवला स्पर्श, न विसरू देतो तुजला.
आवाज तुझा लावितो वेड जीवा वाटते जणू देतेस उंच झोका असा.
वाचण्यास डोळ्यातले भाव तुझ्या जीव हा आतुरला आठवणींच्या हिंदोळ्यावर येऊन विसावला.
तुला भेटण्यास जीव होतोय वेडा पिसा,
होतोय जीव वेडा पिसा..
मिलिन्द मोघे, पनवेल







Be First to Comment