Press "Enter" to skip to content

मी शोधत गेलो

मी शोधत गेलो

मी शोधत गेलो, तुलाच झाडाखाली
अन तुझी आसवे, दवबिंदुसम झाली ।
त्या दवबिंदुसम, झाले हे अनुबंध
मी शोधत गेलो, तिथे हरवला गंध ॥ ॥

मी शोधत गेलो, तुझी सावली मागे
जरी प्रहर थांबले, तरी नेत्रही जागे ।
मग प्रहर विणावा, एकच उरला छंद
मी शोधत गेलो, प्रहरातील त्या गंध ॥ ॥

मी अजून शोधतो, कधीतरी ती वळणे
त्या वळणांवरची, सूर्यास्ताची किरणे ।
क्षितिजावर सजते, किरणांची ती दाद
मी शोधत जातो, क्षितिजावरला गंध ॥ ॥

तुज किती शोधावे, असेच अंतर्नाद
अन् गंधभारल्या कळ्यांतली ती साद ।
त्या सादातुनही मोहरले ते बंध
मी शोधत गेलो, दरवळणारा गंध ॥ © केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.