Press "Enter" to skip to content

नाते

नाते

कसले नाते कुठले नाते
जरा ताणले तुटले नाते

बराच काळ जपले होते
शब्दही होते अर्थही होते

स‌ंवादाविण सारे व्यर्थ होते
ओढ असूनही समजले ना ते..

वेळ गेली क्षण ते सरले
आपुलकी होती, प्रेमही होते

अर्थ मात्र पोरके झाले
अंतरही वाढत गेले

आठवणींना पेव फुटले
शब्द सारे ओझरले

आता मन झाले रिते
सहवासाविण विरले नाते

कसले नाते कुठेले नाते
जरा ताणले तुटले नाते…

श्रद्धा पाटील- जाधव,
खांदा कॉलनी,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.