ती रात्र
मनी अंतरी तूच असावा
तुझ्या विना नकोसे सारे
प्रेम बंध तो जुना असे जरी
नवाच भासे बकुळी परी
अधीर होते रात्रच मग ती
तुझ्या सवे ते मूक बोलणे
क्षण गहिरा तो तुझ्यासोबती
जणू पारखे जग ते सारे
हात हाती नी मूक संमती
नयनी माझ्या तुझीच प्रीती
शब्द नको अन नकोच काही
फक्त हवेसे तुझे आलिंगन
रात्रच सरता सरते सारे
उद्या पुन्हा भिरभिरते वारे
मनी उरे ती फक्त भावना
अन पुन्हा नकोसे सारे
सई मराठे, पनवेल







Be First to Comment