Press "Enter" to skip to content

सलाम

सलाम

जाणाऱ्या२०२० वर्षाला सलाम
येणाऱ्या२०२१ वर्षाला सलाम
2020 खूप काही शिकवून जाते
2०२१ उद्याची स्वप्ने दाखवू पाहते
सलाम सलाम सलाम

कोरोना ला सलाम
चक्रीवादळाला सलाम
अतिवृष्टी ला सलाम आणि
बर्फवृष्टीलाही सलाम
सलाम सलाम सलाम

कोरोना योद्ध्यांना सलाम
घरात बसलेल्या जनतेला सलाम.
शिस्त लावून घेणाऱ्यांना सलाम
नाती जोडणाऱ्यांना सलाम
सलाम सलाम सलाम

भुकेजल्यांना जेवण देणाऱ्यांना सलाम
गरीबांना मदत करणाऱ्यांना सलाम
नवीन तंत्रज्ञानाने शिकविणाऱ्यांना सलाम
नवीन तंत्रज्ञानाने शिकणाऱ्यांनाही सलाम
सलाम सलाम सलाम

घरात बसून नोकरी करणाऱ्यांना सलाम
नोकरी सुटलेल्यांच्या जिद्दीला सलाम
घरात घरकाम करणाऱ्या गृहलक्ष्मी ला सलाम
ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्यांना सलाम
सलाम सलाम सलाम

मुक्तपणे संचार करणार्‍या पक्ष्यांना सलाम
स्वतःत बदल घडविणाऱ्या गाईगुरांना सलाम
जलचर, वनचर, प्राण्यांना सलाम
अदृश्याचा सामना करणाऱ्या निसर्गाला सलाम
सलाम सलाम सलाम

सीमेवर जिद्दीने लढणाऱ्या जवानांना सलाम
अन्न धान्य पिकवणाऱ्या शेतकर्‍यांना सलाम
अत्यावश्यक सेवेतील काम करणाऱ्यांना सलाम
लस तयार करणाऱ्या वैज्ञानिकांना सलाम
सलाम सलाम सलाम

“साहित्य साधना” करणाऱ्यांना सलाम
कलाकारांना सलाम
रंगकर्मींना सलाम आणि
प्रेक्षकांनाही सलाम

उद्योजकांना सलाम
सेवा पुरवणाऱ्यांना सलाम
सेवा घेणाऱ्यांनाही सलाम
जनतेची काळजी घेणाऱ्या सरकारलाही सलाम
सलाम सलाम सलाम

नववर्षाचे स्वप्न पाहणाऱ्या गतवर्षाच्या रात्रीला सलाम
सुख,समृद्धी,शांती, समाधान,आयु,आरोग्य, ऐश्वर्याचा
उदय दाखवणाऱ्या रवी किरणांना सलाम
नवीन वर्षात नवीन स्वप्न दाखवणाऱ्या चांदण्या रात्री ला सलाम
आयुष्यातील दिवस-रात्रीत आपली साथ देणाऱ्या या भारत मातेला त्रिवार सलाम.
सलाम सलाम सलाम

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.