अभिसारिका
कितीदा नव्याने तुला भेटताना नव्यानेच तू भेटशी का पुन्हा,
तुझ्या दृष्टीची मोहिनी काय सांगू कसा जाहला सांग माझा गुन्हा ?
तुला भेटण्याचे, तुला पाहण्याचे तुला स्पर्शण्याचे जीवाला पिसे,
जिथे मी बघावे तुला रे पहावे तुझ्यावाचूनी व्यर्थ सारे असे.
तुझा गंध श्वासात माझ्या भरुनी सुगंधी फुले माळली कुंतली,
मला तूच भासात माझ्या मनाशी शहारा उठे गोडसा मल्मली.
तुझे स्वप्न डोळ्यात मी पाहताना झुले रातराणी जणू जीवनी,
हळू जागताना पहाटे प्रसन्न फुले पारिजात खुळा अंगणी.
सख्या तूच रे तूच व्यापून राही मनाला नसे चैन आता मुळी,
तुझी राधिका मी अभिसारिका मी
पहा ना मला कान्हा बिंबातळी.
अपर्णा साठे, नवीन पनवेल







Be First to Comment