सावित्री तू नसतीस तर…
सावित्री तू नसतीस तर हातात असती फुंकणी .
आली नसती लेखणी. सावित्री तू नसतीस
तर डोईवर हंडा .
आणि बंद झाला नसता हुंडा.
सावित्री तू नसती तर हातात नसता माइक .
आम्ही फक्त तुझेच पाईक. सावित्री तू नसतीस तर
जगणे आमचे असते हीन तुझ्यामुळेच दिसेला
आज सोनियाचा दिन .
सावित्री तू नसतीस तर
मुकलो असतो हक्कास. तुझ्यामुळेच तर आता
जग वाटे झकास.
सावित्री तू नसतीस तर
जीवन काट्या सम अपमानी. आज आमचे आयुष्य फुलापरी सुगंधी स्वाभिमानी.
सावित्री नसती तर कशी झाली असती प्रगती.
तू दिलीस बहुमुलखी कीर्ती
सावित्री तू नसतीस तर
कसे आले असते सामर्थ्य .
तूच दिलास जीवनाला अर्थ.
सावित्री तू नसतीस तर
आमचं काय झालं असतं ?माणूस म्हणून कोणी
आम्हा गणलं नसतं !
सावित्री तू नसतीस तर
कसे जगलो असतो आम्ही ?तुझ्या महानतेचे कृतज्ञ आम्ही !सावित्री तू नसतीस तर कर्तृत्व कसे झाले असते सिद्ध?
हरवली असती आमची जिवंतपणी जिद्द.
सावित्री तू नसतीस तर विचारांना कसे फुटले असते धुमारे. तुझ्यामुळेच दिसले ग जगी आज नजारे.
पूर्णिमा शिंदे, मुंबई







Be First to Comment