Press "Enter" to skip to content

बालपण

बालपण

शुभ्र झरे अन घनराई ती
अंगणामधले शीतल शिंपण ।
कवडशातल्या किरणांमधुनी
पुन्हा गवसले रम्य बालपण ॥

खुशालचेंडु वाटांमधुनी
अधीरतेने बागडले मी ।
झेलत गेले ओंजळीतुनी
आकाशाचे गूढ निळेपण ॥

झ-यामधुनी खळखळणारे
डोळ्यामधुनी वाहत गेले ।
जपले होते थेंबांमधुनी
गोजिरवाणे ते हळवेपण ॥

केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.