Press "Enter" to skip to content

स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे

सरले सरले वर्ष कसोटीचे
सावध स्वागत करुया नव्याचे.

खूप गमावले, शिकलोही खूप
आता करोनाचे वाजवू या सूप.

चुकताच कधी क्षमाही मागू या
स्वभावात थोडा बदल करु या.

मोजकेच खाऊ राहू तंदुरुस्त
आता लक्ष घालू जरा व्यायामात.

अन्नाची नासाडी पडे महागात
भुकेल्यांना वाटा आपुल्या घासात.

सोबतीने चालताना राखू या अंतर
माणुसकी जपू जग होईल मैतर.

संयमाने वागू होऊन आत्मनिर्भर
संवेदनशील मनात आरस्पानी निर्झर.

आवडीनिवडी छंद नेमाने जपू या
मनाच्या आरशात स्वत:ला निरखू या.

अपर्णा साठे, नवीन पनवेल *नूतन वर्षाभिनंदन*.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.