मनोव्यथा
अहो दसरा गेला दिवाळी गेली
सख्या मी तुमची किती वाट पहिली
तुमची स्वारी काही नाही बाई आली
अशाने माझा जीव होतोय वरखाली
तुमच्या वाटेकडे मी डोळे लावून बसले
आल्यावर काय काय करायचे मनसुबे रचले
पण तुम्हाला नाही ते सोयरसुतक कसले
काम काम करून तुम्ही आम्हाला पार विसरले
योजला होता बेत सारा मनातल्या मनांत
पोरांना घेऊन जाऊ या आपल्या कोकणात
समुद्र नारळीफोफळीच्या बागा दाखविल्या असत्या पोरांना
माझाही जीव तृप्त झाला असता भेटून आईबाबाना
नोकरीच्या ठिकाणी राहतसे बदलीच्या गावाला
शिक्षणासाठी पोरांच्या मी राहते या शहराला
माहेर आणि सासर भी पार दूर त्या एका टोकाला
तुम्ही इकडे कधी येणार हा एकच घोर जीवाला
पैसा पानी सर्व सुखसोई आहेत की दिमतीला
पण आपल्या माणसाशिवाय शोभा आहे का त्याला
सारखा सारखा हा कामाचा घोषा तो कशाला
सवड काढून या की सर्वजण जाऊ कोकण दर्शनाला
काय सांगताया!पुढच्याच महिन्यात येताय भेटायला
चांगला वीस दिवसांचा सुट्टीचा अर्ज आहे टाकलेला
खरंच धनी लवकर या मी लागते प्रवासाच्या तयारीला
पोरांची आणि माझीही इच्छा फार दिवसांनी येईल ती फळाला
विलास चव्हाण, नवीन पनवेल







Be First to Comment