Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह /काव्यकट्टा

वाचा श्री.नंदकुमार मरवडे यांची असावा सुंदर गाव आमुचा या विषयावरील प्रबोधनात्मक कविता

असावा सुंदर गाव आमुचा

असावा सुंदर गाव आमुचा
परिसर नसावा अस्वच्छ
नसावेत ढिग केरकच-याचे
सारे कसे दिसावे सुंदर स्वच्छ ……१

राखूनी पर्यावरणाचे संतूलन
अस्वच्छतेवर करण्या मात
होऊनी सारा गाव संघटित
स्वच्छतेसाठी राबावेत हात …..२

करूनी व्रुक्षांचे संवर्धन
हिरवी वनराईने शोभा वाढावी
मुलांपरीस तया जपावे
पर्यावरण संवर्धनाची कास धरावी ….३

भांडणतंटा मुळी नसावा
नांदावित सारी एकोप्यानं
सण उत्सव समारंभ सारे
साजरे करावेत एकदिलानं ……….४

शिक्षणातही अग्रेसर व्हावा
अंगी सुसंस्कृतपणा यावा
आदर्श ठरावे आमुचे गाव
सा-यांनी त्याचा आदर्श घ्यावा ……..५

श्री.नंदकुमार मरवडे, श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी, ता.रोहा,जि.रायगड. मोबा.नं.8308688229

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.