Press "Enter" to skip to content

शब्द

शब्द

शब्दच माझे जीवाचे जीवन
शब्दच माझे अंतरीचे मन

मनांत गुंफता शब्दांचा शेला
शब्दांची बाग केतकी भाला

शब्द जणूं शारदा नुपूर
शब्द सूर , मनी हुरहूर

शब्द शब्दांस जपती
शब्द घायाळ करिती

होता शब्द पडझड
शब्द वेचणे होई अवघड

शब्दांवर शब्दांची तटबंदी
रोखुया शब्द होण्या जायबंदी

विसावु शब्दांच्या खांद्यावर
शब्दच हळुवार फुंकर

शब्दांचा भार शब्द वाहती
शब्दांने शब्दांची पंचारती

शब्द भाळ , शब्द टाळ , शब्द आभाळ
शब्दांनी विणला हिरवा रानमाळ

पुस्तकांच्या पानांतून शब्द बोलती
जसे अभंगातून गाथेच्या तुकोबा डोलती

संगीता थोरात, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.