Press "Enter" to skip to content

कशाला उगा

कशाला उगा

कशाला उगा ते जुने आठवावे?
जुने ते परंतू नव्याने दिसावे
असे का घडावे? न काही कळावे?
जसे आज सारे पुन्हा शांत व्हावे..

कशाला हसावे? कशाला रडावे?
जुने ते खरे आज सोडून द्यावे
तरी भास सारे मनाला दिसावे
पुन्हा आज ते पाणी डोळ्यात यावे..

असे आठवांनी नव्याने जुळावे
पुन्हा आज त्यांनी रुसावे चिडावे
नव्या आठवांनी नव्याने वसावे
नवे गीत ते आज ओठात यावे..

असे ती प्रतीक्षा नव्या आठवांची
जणू ही अपेक्षा नव्या अंतरीची
पुन्हा आठवांनी नवे गीत गावे
कशाला उगा ते जुने आठवावे?

समीर खरे, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.