माय मराठी
माझ्या भाषेची गं कौतुके
शब्दा शब्दातुनी मांडली
बोली भाषेच्या कोदणांनी
काया तिची गं ती नटवली
लावुनिया मातीचा टिळा
गौरोविली गं माय मराठी
मेळवुनी जन मनास अवघी
रोवली अभिमानाची काठी
ज्ञाना,तुका अन् नाथांनी
कवणे ,सादी सरळ रचली
संसाराचे सार बघा कसे
दासांनी साधी सांगितली
लिहुनी बोलीतुन प्रेरणागीत
स्वतंत्र्याची ज्योत पेटवली
रक्त सांडुनी त्या शुर वीरांनी
आन माय मराठीची राखली
संगीता देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment