दत्तजयंती
अनादि अनंत त्रैलोक्याचा सगुण
आधार
अत्रिमुनींच्या सदनी जन्मे श्रीदत्त अवतार।।धृ।।
पौर्णिमेचा पावन दिन हा
मार्गशीर्ष मास
दत्तजयंती उत्सव मेळा
भक्ती सहवास
वसुंधरेने धारण केला नूतन शृंगार||१||
ब्रम्हा-विष्णु-महेश तत्व
अवधूत मूर्ती
वात्सल्याने हर्षित माता
अनसूया सती
बाल रूपी दत्त योगी जगत तारणहार||2।।
वाडी औदुंबरी दत्त पालखी
भक्तीचा पूर
भक्तगणांनी फुलून गेला
कृष्णेचा तीर
श्रीपाद स्वामी नृसिंह स्वामी करुणासागर।।3।।
दत्त दिगंबर तारक मंत्र
करता गजर
गुरुमाऊली उभी पाठीशी
करण्या उद्धार
मी पण सोडा चरणांबुजी करा नमस्कार।।४||
सुजाता खरे, नवीन पनवेल







Be First to Comment