मी आणि माझी छाया
मी आणि माझी छाया
दोघीही असतेच जवळ
एकमेकांवर प्रेम असतं
साथ कधी छोडत नाही…..
अचानक कुठून तरी
ढग येतो अलगद
छाया नाहीशी होते…..
मोकळ्या आकाशात
परत येते माझ्या मागे
सांगून जाते हळुवारपणे
घाबरून जाऊ नको…..
एक तर असा मित्र
जी आयुष्यभर साथ देते
जन्म पासून सोबत राहते
चितेवर शुद्धा सोबत जाते……
कारण ती छाया असते
मानवी जीवनातील
एक अभेद्य अंग….
रात्र झाली तर लपून जाते..
दिवसा मात्र सगळ्यांना दिसते….
प्रकाश आहे म्हणून सावली आहे
मी आहे म्हणून छाया आहे …
प्रकाश नसला तर मी नाही..
तर छाया कुठून येणार…?
अपराजिता माधव घांगुर्डे, खांदा कॉलनी







Be First to Comment