गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे माझे
आसावले दोन नैना
तव मिलनाची आस
तुझ्या प्रीतीची मैना
केली प्रीत तुझ्यावर
घातला मनास आवर
सख्या असला दुरावा
तू येऊनी मज सावर
साद घालते ही सखी
पाणावले माझे डोळे
प्रीतीच्या चांदण्यांचे
झालेतच सुरु सोहळे
नको देऊ विरहवेदना
आस लागली भेटीची
ये रे धावूनी झडकरी
पाहतेय वाट मिठीची
चिंब न्हाऊ दे प्रेमरंगी
झाला हा जीव बावरा
घट्ट तव मिठीत फुलेल
अंगावर रोमांच शहारा
राहुनी उभी अंगणात
भिजले चिंब पावसात
नाही दिलेस दर्शन तरी
ना भेट किती दिवसात
तुझ्या मिलनाची सख्या
लागलीय मनास हुरहूर
ओढ वाटते तव भेटीची
पेटलेय हृदयात काहूर

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835








Be First to Comment