मुर्दाडांचा समाज
हा मुर्दाडांचा समाज
ती शोषितांची झोपडी
समाजाच्या डोळ्यात धूळ फेकत
खुर्चीतल्यांची सतराशे साठ लफडी
दररोजचेच समाजव्यवस्थेवर बलात्कार
कधी होणार समाजमनाला साक्षात्कार
अस्तिनातील निखार्यांनी तोवर
जाळून खाक केली झोपडी
अनिष्ट व्यवस्थेचे साखळदंड तुटायला हवेत
पण ते तोडण्याचे कोणा धारिष्ट नाही
तुटेल जोवर साखळदंड अनिष्टेचा
शोषितांची झोपडी मात्र टिकणार नाही
झोपलेल्या येते उठवता
सोंगाचे काय करणार हा प्रश्न अनुत्तरीत
जागेल जोवर समाज झोपलेला
शोषितांचे सांगाडेही दिसणार नाहीत
अत्याचाराने पिचलेल्या शोषितांचा
आवाज पुन्हा उठणार नाही
जर संघर्षाचा वणवा आता पेटणार नाही
जर संघर्षाचा वणवा आता पेटणार नाही
संदिप तांबे, माहीम, मुंबई







Be First to Comment