ते निष्पाप_जीव
उगवलेली कळी उमलण्या आधीच जळाली
निष्पापांचा जीव घेऊन इहलोकी वळाली
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वाजलेलेच तीनतेरा
कधी संपणार हा सरकारी अनास्थेचा फेरा
मुर्दाडांचा समाज खोटी आसवे गाळी
नवजात बालकांच्या अकाली जाण्याचे लिहिले होते का भाळी..?
चार दिस सरता विसरेल समाज सारे
हळूच विरले जाईल या दुर्घटनेचे वारे
दुर्घटनांचे दुष्टचक्र हे कधी थांबायचे नाही
जोवर आपण बंद केलेले डोळे उघडणार नाही
भंडार्याच्या आगीत निष्पाप बालके जळाली
जागलो नाही आता तर बसेल आपल्यालाही झळाळी
आता तरी जागा रे, करा आवाज अपुला बुलंद
धजावेल ना कोणी उघडण्या भ्रष्टाचाराची दारे बंद…
संदिप तांबे, माहीम, मुंबई







Be First to Comment