Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : वडीलधाऱ्यांचा आदर

वडीलधाऱ्यांचा आदर
राखा तुम्हीं त्यांचा मान
झिजवली त्यांनी काया
करा कार्याचाही सन्मान

जास्त झेलेले पावसाळे
अनुभवच त्यांना जास्त
त्यांच्या छत्रछायेखाली
राहाल तुम्ही चुस्तफुस्त

वडीलधाऱ्यांना कधीही
नकाच तुम्ही हो दुखवू
टक्केटोणपे खाल्ले जगी
गोड बोलण्यांने माखवू

देतील नेहमीच तुम्हाला
चांगुलपणाचा ते सल्ला
त्यांच्या या पुण्याईमुळेच
जिंकाल यशाचा किल्ला

देता आदर मिळेल मान
तुमची वाढेल मग शान
वडीलधाऱ्यांचा आशीष
तुमचा खराच सन्मान

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.