शेतकरी
माणूस तो साधा
राबतो लोकांसाठी
तो काळ्या मातीत सदा,
कसदार जमीन हीच
त्याची माऊली,
उत्तम प्रतीची लागवड
करून सर्वांचा आरोग्याची
काळजी करतो
पावलो पावली,
सतत कष्ट करताना
ऊन वारा पाऊस
घेतो अंगावरी,पण
त्याची काळजी
कोण ना करी,
घेतलेच नाही ठरवून
जर ,पीक शेतकरी
बांधवांनी तर, कितीही
असला पैसा, तरी जगणे
होईल हो भारी,
म्हणून म्हणावंसं वाटत
देव तारी त्याला कोण मारी,
माझा शेतकरीच
सर्वांना भारी.
नीता घाटुगडे, नवीन पनवेल







Be First to Comment