मन
मन अथांग सागर
लाटा विषयांच्या उसळती फार
अव्यक्त भावना दाटता
किनारा राही दूर
मन सोसाट्याचा वारा
क्षण ही न मिळे त्या थारा
कोण अडवू शकेल तयाला
व्यर्थ ची भासे हा पसारा
मन उधळलेला वारू
मन भरकटलेले तारू
मन होई फुलपाखरू
सांगा कसे तया आवरू
कसे तया आवरू.
संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment