भैरवी
थांबायचे कुठे
कळायला हवे
वेळीच भैरवीचे सुर
छेडायला हवे
संपु नये वाटतांना
मैफिलीची सांगता
लावुनी जाते हुरहुर
भैरवीची स्वरता
योग्य अशा काळी
जर झाली सांगता
मगच नवं निर्मितीची
मनामनात उत्सुकता
सूर्यास्त फक्त त्या
दिवसा पुरता,पुनश्च
सूर्योदयाची किरणें
घेवुनी येती प्रसन्नता
वैशाली केतकर, नवीन पनवेल







Be First to Comment