अवतार
खरच असे घडेल का?
स्वप्न सत्यात उतरेल का?
एक वचनी एक बाणी
राम जनी दिसेल काय?
प्रेम त्याग भक्तीची ही
ओळख नवीन होईल काय?
भरकटलेल्या जनास पुन्हा
सत्य मार्ग दिसेल काय?
खरच असे घडेल का?
खरच असे घडेल का?
स्वप्न सत्यात उतरेल का?
सावळा तो कृष्ण माझा
अंगी किंचित भिनेल का?
कलियुगातील दैत्यांचा ह्या
संहार कधील होईल का?
दहशतीचे सावट जाऊन
शीतल वारे वाहतील का?
मरगळलेल्या मनास कधी
पालवी नवी फुलेल का?
कलियुगात पुन्हा कधी
देवयुग नांदेल का?
खरच असे घडेल का
स्वप्न सत्यात उतरेल का?
अनंत खोत, विलेपार्ले, मुंबई







Be First to Comment