इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन दिन धडाक्यात संपन्न
सिटी बेल • सिबीडी – बेलापूर •
अल्पावधीतच यशोशिखरे गाठणारे इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन दिन सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी धडाक्यात संपन्न झाला. पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिटी बेल वृत्त समूहाच्या माध्यमातुन एंजॉय को वर्किंग स्पेस या नवीन प्रोडक्ट ची उद्घोषणा करण्यात आली. रायगड नवी मुंबई परिसरातील अनेक दिग्गज मान्यवरांनी यावेळी सिटी बेल वृत्त समूहाला शुभेच्छा दिल्या.
समूह संपादक मंदार दोंदे,समूह संपादक विवेक पाटील आणि टेक्नॉलॉजी डायरेक्टर वैभव सोनटक्के या तिघांनी एकत्र येत सिटी बेल समूहाची स्थापना केली. सगळे जग कोरॉना महामारी मध्ये लादलेल्या लॉक डाऊनमुळे आपापल्या घरात बसले असताना या तिघांनी संकटात संधी शोधत ऐन कडक लॉक डाऊन मध्ये वृत्त संस्थेची घोषणा केली. सिटी बेल इंग्रजी साप्ताहिक हे या वृत्तसंस्थेच्या अनेक प्रोडक्स पैकी एक प्रॉडक्ट आहे. सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी इंग्रजी साप्ताहिक सिटी बेलने आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला. सिटी बेल मल्टी लींग्वल न्यूज पोर्टल, सिटी बेल अँड्रॉइड ॲप्लिकेशन, सोसायटी किंगडम, एन्जॉय को वर्किंग स्पेस, सिटी बेल इंग्रजी साप्ताहिक, दैनिक कर्नाळा डिजिटल, सिटी बेल मीडिया अँड इव्हेंट मॅनेजमेंट अशी या वृत्त समूहाची प्रोडक्ट्स अल्पावधीतच वाचक वर्गाच्या मनावर गारुड घालत आहेत.
इंग्रजी साप्ताहिक सिटी बेल च्या पहिल्या वर्धापनदिनी शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर सी भाई घरत, पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेशशेठ ठाकुर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव एड. प्रवीण ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार मनोज जालनावाला, दैनिक वादळवारा चे ज्येष्ठ संपादक विजय (अप्पा) कडू, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार साहिल रेळेकर,पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचे सचिव वैभव पाटील, जी बी एल चे संचालक आशुतोष पाटील,सुप्रसिद्ध उद्योजक, कांडपिळे ट्रान्सपोर्ट चे सुरेश शेठ कांडपिळे, सुनील शेठ पगडे, प्रिंटवन सोल्युशन चे संचालक प्रशांत चातुर्य, श्रीकृष्णदेव साळुंखे, संतोष सोनके यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सीटबेल वृत्त समूहाला शुभेच्छा दिल्या.
Be First to Comment